नवी दिल्ली : श्री सत्य साई यूनिव्हर्सिटी फॉर ह्युमन एक्सिलेन्सच्या दीक्षांत समारंभाला संघ प्रमुख मोहन भागवत यांनी हजेरी लावली. तेथील भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांनी धर्म परिवर्तनाचाही उल्लेख केला. तसेच लोकसंख्येवर मोठे विधानही केले आहे.
मोहन भगत यांनी सांगितले की, “जिवंत राहणे हे जीवनाचे ध्येय असू नये. मानवाची अनेक कर्तव्ये आहेत, जी त्यांनी वेळोवेळी करत राहिली पाहिजेत. फक्त खाणं आणि जन्माला घालणं ही काम तर जनावरे देखील करतात. शक्तिशाली लोकच टिकतील, हा जंगलाचा नियम आहे. तोच शक्तिशाली जर दुसऱ्यांचे रक्षण करत असेल तर तो मनुष्य असल्याचा पुरावा आहे”
सध्या देशात लोकसंख्येवरून मोठा वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच यूएनच्या अहवालात भारत लवकरच चीनला मागे टाकेल, असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मोहन भागवतांच्या या विधानाला महत्त्व आहे. आपल्या भाषणात त्यांनी वाढत्या लोकसंख्येवर थेट काहीही न बोलता प्राणी आणि माणूस यांच्यातील फरक सांगून मोठा संदेश दिला आहे.
भारताच्या विकासावर बोलताना मोहन भागवत म्हणाले, इतिहासातील गोष्टींपासून शिकून आणि भविष्यातील विचार समजून घेऊन भारताने गेल्या काही वर्षांत आपला योग्य विकास केला आहे. हे 10-12 वर्षांपूर्वी कोणी बोलले असते तर कोणीही ते गांभीर्याने घेतले नसते. जो विकास आता दिसतो आहे, त्याचा पाया 1857 मध्ये रचला गेला आणि नंतर विवेकानंदांनी आपल्या तत्त्वांनी तो पुढे नेला. पण या सगळ्यामध्ये विज्ञान आणि बाहेरच्या जगाचा अभ्यास यांच्यात संतुलनाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत असल्याचे भागवतांचे मत आहे.
“तुमची भाषा वेगळी असेल तर वाद होतात. तुमचा धर्म वेगळा असेल तर वाद होतात. देश दुसरा असला तरी वाद होतात. पर्यावरण आणि विकास यांच्यात नेहमीच वाद राहिलेला आहे. अशा स्थितीत गेल्या 1000 वर्षांत या जगाचाही अशाच प्रकारे विकास झाला आहे,” असे मोहन भागवत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Nitin Gadkari | वाहनांच्या वेगमर्यादेबाबत नवे निर्णय घेणार; नितीन गडकरींची घोषणा
- MNS : अमित ठाकरेंना शिंदेंच्या मंत्रीमंडळात स्थान मिळणार; पहा राज ठाकरे काय म्हणाले?
- Sandip Deshpande | शिवाजी पार्क मैदानावरील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प मोडीस निघाला- संदीप देशपांडे
- Affordable bikes । कमी बजेटमध्ये जास्त मायलेज देणारी बाईक घ्यायची आहे?; पहा “या” आहेत 65000 पेक्षा कमी किंमतीच्या बाईक्स
- Clyde Crasto : “केसरकर मंत्रिपदाच्या आशेने स्वतःची…”, पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<