पराभवानंतरही भवानी देवीने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी ठरली पहिलीच भारतीय

मुंबई : २३ जुलै पासून टोकियो ऑलिम्पिकला सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिडा जगतासाठी खुपच आनंद देणारा ठरला. ऑलिम्पीक स्पर्धेत भारताने टेबल टेनीस, बॉक्सिंग आणि बॅडमिंटन मध्ये विजय मिळवला. तर स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी मीराबाई चानुने रौप्य पदकाची कमाई करत भारताचे पदकाचे खाते उघडले.

ऑलिम्पिक स्पर्धेत सोमवारी तलवारबाजीत भवानी देवीने स्पर्धेत भाग घेतला. भारताकडून या क्रिडा प्रकारात सहभाग नोंदवणारी ती पहिलीच खेळाडू आहे. भवानी देवीने एकेरी महिला गटात नादिया बेन अजिजी या ट्यूनेशियाच्या खेळाडूला १५-३ ने पराभूत करत इतिहास घडवला. फेरीच्या सुरवातीपासूनच भवानी देवीने आपले वर्चस्व ठेवले. नादिया बेन अजीजीला नमवत पहिल्या फेरीत ८-० ची बढतही मिळवली. दुसऱ्या हाल्फमध्ये नादिया लढत देण्यात अपयशी ठरली आणि भवानी देवीने विजय मिळवला. सीए भवानी देवीने हा पराक्रम अवघ्या ६ मिनिट १४ सेकंदात केला.

नाजिया विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर भवानी देवीची लढत फ्रांसच्या मॅनोन ब्रुनेट विरुद्ध झाला. मात्र ७-१५ ने ब्रुनेटने भवानी देवीला पराभूत करत ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. भवानी देवीचा पराभव जरी झाला असला तरी तिच्या खेळीबद्दल भारतीय क्रीडारासिक सोशल मीडिया वर कौतुकाचा वर्षाव करत आहे. तलवारबाजीत भारताचे नाव केल्याबद्दल सर्वांना तिचा अभिमान वाटत आहे. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता न मिळाल्यामुळे भवानी देवी निराश झाल्या होत्या मात्र त्यानंतर पाच वर्षं मेहनत घेऊन त्यांनी आपले नाव टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या