Share

Bacchu kadu | रवी राणा अन् बच्चू कडू यांच्या वादाचा अद्यापही अंत नाही? राणांच्या दिलगिरी नंतर सुद्धा बच्चू कडू म्हणाले…

Bacchu kadu | मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि स्वाभीमान पक्षाचे रवी राणा (Ravi Rana) यांच्यातला वाद मिटण्याची शक्यता दिसत असताना बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्याने लोकांना कोड्यात टाकलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राणा आणि कडू यांना चर्चेसाठी मुंबईला बोलावले होते. या वादात रवी राणा यांनी शब्द मागे घेतल्याचे सोमर येत आहे.

राणा यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, बच्चू कडू (bacchu kadu) यांनी आपले शब्द मागे घेतले नसून वाद मिटल्याचं देखील स्पष्टपणे सांगितलं नाहीये. एवढंच नाही तर ज कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भूमिका जाहीर करू, असं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत. त्यांनी मला बोलवल्यानंतर ३ साडे तीन तास मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. काही विचार, भाषा न पटणारी होती त्यावर देखील चर्चा झाली. बच्चू कडू आणि मी आम्ही दोघे ही सरकारसोबत आहे. जे आमदार आहेत ते सुध्दा माझे सहकारी आहेत. गुवाहाटी संदर्भात काही वाक्य निघाले असतील तर ते मी मागे घेतो. पण ज्या पध्दतीने बच्चू कडू यांनी जे वक्तव्य केलं ते न पचणारे होते. मला बच्चू कडू यांच्याकडून अपेक्षा आहे की, ते सुध्दा त्यांचे शब्द मागे घेतील, असं रवी राणा यांनी म्हटलं होतं.

शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतल्याचे सांगितले. तर बच्चू कडू लवकरच त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Bacchu kadu | मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि स्वाभीमान पक्षाचे रवी राणा (Ravi Rana) …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now