‘तळाच्या फलंदाजानी केलेल्या २०-३० धावांही निर्णायक असतात’, अजिंक्य रहाणे

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर सुरुवातीला झालेल्या डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला ८ गाडी राखून पराभव केला. आता येत्या ५ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड संघादरम्यान कसोटी मालिका सुरू होत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपुर्वी भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने एक मोठे वक्तव्य केले आहे. कसोटी सामन्यात तळाच्या फलंदाजानी केलेल्या २०-३० धावांही खुप जास्त महत्वाच्या ठरतात. या धावा देखील सामन्याचा निर्णय बदलु शकतात असे रहाणे म्हणाला. याच दौऱ्यात सुरुवातीला झालेल्या डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे तळाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. तर प्रतिस्पर्धी संघ न्युझीलंडच्या तळाच्या फलंदाजानी मात्र चांगली फलंदाजी केली होती.

गेल्या काही वर्षात कसोटी सामन्यात भारतीय संघासाठी सर्वात मोठी डोकेदुखीही प्रतिस्पर्धी संघाचे तळाचे फलंदाज ठरले आहे. तर दुसरीकडे भारताचे तळाचे फलंदाज योगदान देऊ शकत नाही. मात्र याच वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाच्या तळाच्या फलंदाजानी शानदार खेळ दाखवला होता. वॉशिग्टंन सुंदर आणि शार्दुल ठाकुर यांनी तळाला फलंदाजी करताना मोलाची भूमिका निभावली होती.

महत्वाच्या बातम्या