पुण्यातील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत इथिओपियाचा सोलोमन ठरला विजेता

टीम महाराष्ट्र देशा : 34 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. सारसबागेजवळील बाबुराव सणस मैदानापासून माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी या मॅरेथॉनला सुरुवात करून दिली. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदा देखील परदेशी खेळाडूचे वर्चस्व पाहण्यास मिळाले. यामध्ये मुख्य मॅरेथॉन 42 किमी, हाफ मॅरेथॉन 21 किमी, 10 किमी, व्हील चेअर अशा विविध अंतरगटाचा समावेश आहे.

पुरुष गटात इथिओपियाचा सोलोमन हा विजेता ठरला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्पर्धेचे आयोजक माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन विजेत्यांचा विशेष गौरव करण्यात आला. ४२ किलोमीटर पुरुष, २१ किलो मीटर पुरुष आणि महिला, १० किलोमीटर पुरुष आणि महिला, पाच किलोमीटर मुले आणि मुली आणि चॅरिटी रन साडेतीन किलोमीटरमध्ये ही स्पर्धा पार पडली.

या भारतीय मॅरेथॉनचे हे १०० वे वर्ष आहे. यामध्ये धावपट्टूंनी मोठ्या उत्साहात या स्पर्धेत सहभाग घेतला. तसेच पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे विश्वस्त अभय छाजेड, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू रोहन मोरे, उपमहापौर सरस्वती शेडगे, स्पर्धा संयोजन सचिव सुमंत वाईकर, गुरुबन्स कौर, सचिन आडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

Loading...