संतापजनक : उत्तरप्रदेशमध्ये ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून खून

टीम महाराष्ट्र देशा : उत्तरप्रदेशमधील एटा जिल्ह्यामध्ये एका 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली आहे . तर या प्रकरणी आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकणांवरून देशात संताप असताना उत्तर प्रदेशमध्येच आणखी एक भयानक घटना घडल्याने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळी आहे.

एटा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरवात झाल्याने उत्तरप्रदेश पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

एटा जिल्ह्याच्या शीतलपूर भागात रविवारी एका विवाह सोहळ्यात ही चिमुरडी गेली होती. तिथून तिला आमिष दाखवून या नराधमानं निर्मनुष्य जागी नेलं, आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केले. नंतर त्याला भीती वाटली आणि त्यानं तिची हत्या केली.

You might also like
Comments
Loading...