अल-कायदा काश्मीर खो-यात सक्रिय ?

श्रीनगर : लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महोम्मद व हिज्बुल मुजाहिद्दीन नंतर अबू दुजाना व आरिफच्या मृत्यूनंतर अल-कायदा ही दहशतवादी संघटनाही काश्मीर खो-यात पुन्हा सक्रिय झाल्याचा असा अंदाज वर्तवला जात आहे .
अबू दुजान अल कायदाची काश्मीर शाखा समजल्या जाणाऱ्या अंसार गजवत-उल-हिंदमध्ये सहभागी झाला आहे. काश्मीर खो-यातील या सेलचा म्होरक्या झाकिर मूसा आहे, असे आरिफने आपल्या भावाशी झालेल्या शेवटच्या दूरध्वनीत सांगितले होते. त्यानंतर शुक्रवारी झाकिर मूसा अबू दुजाना व आरिफची प्रशंसा करणारी ध्वनीचित्रफितही प्रसिद्ध केली होती. हे दोघे काश्मीर खो-यातील अल-कायदाचे पहिले शहीद असल्याचे त्याने या चित्रफितीत म्हटले होते.
आरिफने आपल्या कुटुंबियांना केलेल्या शेवटच्या दूरध्वनीत त्याने आपला मृतदेह अल-कायदाकडून वापरण्यात येणा-या झेंड्यात गुंडाळावा, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आरिफ व अबू जुजानच्या मृत्यूचा बदला म्हणून अल-कायदा काश्मीरमध्ये पुन्हा सक्रिय होत असल्याचे सांगण्यात येत आहे.