प्रस्तापितांच्या राजकारणाला कंटाळून राज्यात शिक्षकांनी केली आदर्श संघटनेची स्थापना

करमाळा/ नितीन व्हटकर : महाराष्ट्रातील जुन्या प्रस्थापित संघटनाचे नेत्याच्या  मनमानी, हुकूमशाही वारसानीती या कार्यप्रणालीविरोधी संतप्त होऊन हजारो शिक्षकांनी एकत्र येऊन ५ मे रोजी आदर्श शिक्षक समिती ची स्थापना केली आहे याची घोषणा औरंगाबाद येथे शिक्षक दिनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बदली विस्थापित अन्यायग्रस्त शिक्षकांचे विराट धरणे आंदोलन प्रसंगी करण्यात आली, येत्या 20 सप्टेंबर रोजी शिक्षक भवन येथे राज्यकार्यकरिणी निवड होणार आहेत. त्यानंतर लगेच  प्रश्ना संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबई येथे चर्चा करण्यात येणार आहे.

राज्यात प्राथमिक शिक्षक च्या मुख्य दोन संघटनांचे प्रस्थ होते यामध्ये शिक्षक संघ व प्राथमिक समिती, परंतु मागील आठ नऊ वर्षांपासून संघ दोन गटात विभागला गेला. त्याच्या पाठोपाठ जानेवारीत प्राथमिक समितीचे ओरोस राज्याधिवेशनापूर्वीच काळू बोरसे व शिवाजी साखरे असे दोन गट होऊन फूट पडून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. अधिवेशनातं राज्यकार्यकरिणी पदाधिकारी निवड करून राज्य अध्यक्ष उदय शिंदे व शिवाजी साखरे असे दोन गटाचे दोन राज्यअध्यक्ष जाहीर करून काम करू लागले. अधिवेशनात लाखो  कोट्यवधी रुपयांचा अधिवेशन निधी, वार्षिक सभासद निधी, आजीव सभासद निधी व देणग्या रुपी रक्कमेच्या, जमा -खर्च  मध्ये लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत असे. पदाधिकारी निवडतांना कायम घटनाबाह्य निवड करण्यात येते.

निवडीचे निकष लावताना  प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्याला डावलून प्रांत, जात, धर्म, वारसदार , राजकीय वजन असे निकष लावले जातात. या पातळीवर दोन्ही बाजूंनी आरोप- प्रत्यारोप महिनोंमहिने सुरु होते. या आरोपात बऱ्याच प्रमाणात सत्यता होती. समितीत सर्वकाही आलबेल आहे हा भ्रम एवढे वर्ष राज्यात शिक्षकांमध्ये होता. परंतु समिती नेत्यांचे खरे रूप अधिवेशनातील वादामुळे दिसले.

दरम्यान काळात सांगोला येथे साखरे यांना पुढील वेळी राज्य अध्यक्ष करण्यात येईल म्हणून  मिळून घेतले. दोन्ही मुख्य संघटनेच्या सत्ता राजकारणाचे मूळ कारण अर्थकारण’ अशीच चर्चा राज्यभर शिक्षक वर्तुळात होती. दुसरीकडे राज्यातील शिक्षक २७/२ च्या अन्यायकारी बदली धोरणामुळे प्रचंड प्रमाणात त्रस्त होता तर, जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून dcps धारकाचे आंदोलने सुरु होते.

शिक्षकांचे प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी प्रस्थापित संघटना मात्र स्वतःच्या स्वार्थापुरते सत्ता टिकविणे यातच मश्गुल होते. त्यांच्या या राजकारणाला  गेली अनेक वर्षांपासून सर्वसामान्य तरुणपिडीचा राज्यातील शिक्षक पूर्णपणे कंटाळला होता. बदली धोरण विरोधी व जुनी पेन्शन, अन्य  प्रश्नासाठी प्रस्थापित संघटना शासनाशी संघर्ष करीत नाही ही बाब सर्वांच्या लक्षात आली म्हणून राज्यभरात जिल्ह्या जिल्ह्यात शिक्षक एकत्र येऊन कृती समिती च्या माध्यमातून अन्याय विरोधी  आंदोलने सुरू केले व शासनाकडे पाठपुरावा सुरु केला.

अनेक अन्यायग्रस्त शिक्षक यांनी न्याय मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतली,   प्रस्थापित संघटना नेते मात्र गप्प बसून राहिले यातूनच शिक्षकांच्या मनात प्रचंड प्रमाणात नाराजी होती. त्यातच समितीचे सदस्य असलेले राज्यातील मोठागट एकत्रयेऊन आदर्श शिक्षक समितीची स्थापना करण्यात आली या नवीन संघटनेत अन्य विविध संघटनेचे शिक्षक प्रचंड प्रमाणात सहभागी होतांना दिसून येत आहेत.   मोठ्या प्रमाणात राज्यात आदर्श शिक्षक समितीच्या माध्यमातून परिवर्तन घडवून येणार आहेत असे चित्र राज्यभर निर्माण झाले आहेत.

दरम्यान, प्रस्थापित संघटनेच्या सत्ता व संपत्ती,  गट- तट राजकारण , वारसानीती, भेदभावनिकष लावून पदाधिकारी निवडी करणे. सर्वात महत्वाचे शिक्षकांच्या बरोबर शिक्षण विद्यार्थी यांचे प्रश्न सोडविण्यात प्रस्थापित संघटना मागील दोन दशकापासून अपयशी  ठरलेल्या आहेत.या कारणाने आदर्श शिक्षक समिती ची स्थापना करण्यात आली आहे , यापुढे संघटनेत निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही. प्रामुख्याने शिक्षणाचे व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याकडेच संघटनेची वाटचाल  राहील!! असे मत आदर्श शिक्षक समितीचे दिलीप ढाकणे याांनी व्यक्त केले. तर  प्रस्थापित वर्गाकडून प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्यावर होणार अन्याय व विद्यमान पदाधिकारी यांची शिक्षक प्रश्नासंदर्भात असणारी उदासीनता सहन होत नसल्याने आम्ही हा पर्याय निवडला असून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यास आदर्श शिक्षक समिती च्या माध्यमातून कटिबद्ध आहोत. असे या समितीचे समन्वयक राजकुमार राऊत यांनी म्हटले आहे.