कोरेगाव-भीमा दंगलीच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करा

मराठा युवा संघाची मागणी

टीम महाराष्ट्र देशा: कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसाआयटी) स्थापन करावे अथवा सीबीआय कडे तपास देण्यात यावा, अशी मागणी मराठा युवा संघ तर्फे करण्यात आली आहे. कोरेगाव-भीमा येथे शोर्यदिनानिमित्त दगडफेक झाली होती. दरम्यान, एका युवकाचा मृत्य झाला होता.

१ जानेवारी, २०१८ रोजी कोरेगाव भीमा परिसरात झालेल्या हिंसाचारात एक जण मृत्युमुखी पडला, अनेक जण जखमी झाले व कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले. या विषयात पूर्वसूचना मिळूनही पुणे ग्रामीण पोलिसांकडून तत्काळ कारवाई केली नाही व योग्य खबरदारी घेतली नाही असा आरोप मराठा युवा संघाचे कार्यवाह दत्ता शिर्के यांनी केला आहे. त्यामुळे तपासासाठी विशेष तपास पथक (एसाआयटी) स्थापन करावे अथवा सीबीआय कडे तपास देण्यात यावा, अशी मागणी मराठा युवा संघ तर्फे करण्यात आली आहे.