संघाला उघडायचीय मुस्लीम विद्यापीठात शाखा; कुलगुरूंना मागितली परवानगी

rss

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून ते आजवर संघाला मुस्लीन विरोधी म्हणून ओळखल जात. मात्र संघ हा मुस्लीम विरोधी नसून देशसेवेचे कार्य करणारी संस्था आहे, हाच विचार मुस्लिम तरुणांमध्ये रुजवण्यासाठी अलीगड मुस्लीम विद्यापीठात ‘शाखा’ भरवण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. याबद्दलचे पत्र देखील एका संघ स्वयंसेवकाकडून कुलगुरू तारिक मन्सुर यांना देण्यात आले आहे.

नेमका संघ काय आहे, संघाची शिकवण आणि कार्यपद्धती जाणून घेण्याची इच्छा मुस्लिम तरुणांमध्ये असल्याच या पत्रात सांगण्यात आल आहे. तसेच काही काही लोक मुद्दामून मुस्लीम तरुणांना संघा विषयी चुकीची माहिती देत आहेत. त्यामुळे हे सर्व दूर व्हाव्यात अशी आमची इच्छा असल्याचही पत्रात सांगण्यात आल आहे.