दहशतवाद्यांच काय झाल; जखमी मेजरचा शुद्धीवर येताच प्रश्न

मेजर अभिजित यांच्या मायुभूमिवरील प्रेमाच देशभरातून कौतुक

एक सैनिक हा त्याच्या मृत्यू समयीही देश हिताचाच विचार करतो हे सर्वज्ञात आहे. वेळ काळ कोणतीही असो संकटसमयी मायभूमीवर प्रेम करणारे सैनिकच देशासाठी प्राणाची आहुती देतात. याच ज्वलंत उदाहरण सध्या सुंजवा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले मेजर अभिजीत यांच्या रूपाने दिसत आहे.

शनिवारी पहाटे जम्मूतील सुंजवां इथल्या लष्कराच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी लष्करी तळावर हल्ला केला. या हल्यात मेजर अभिजित हे जखमी झाले होते. शुद्धीवर येताच त्यांनी दहशतवाद्यांचे काय झाले असा थेट सवाल उपस्थितानां विचारला. एखाद्या व्यक्तीला थोडीजरी इजा झाली तर तो प्रथम तो स्वत: बद्दल विचार करतो. मात्र, मेजर अभिजित यांनी देशहिताचा विचार आपल्या कृतीतून दाखवून दिल्याने देशभरात त्याचं कौतुक केल जात आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

जम्मूमधील सुंजवा, येथील लष्करी तळावर काही दहशतवाद्यांनी सैनिकांच्या वेशात येत हल्ला केला. यामध्ये पाच जवान शहीद झाले आहेत. तर चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आल. हा हल्ला जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांनी केल्याच उघड झाल आहे. याच हल्ल्यात मेजर अभिजीत हे जखमी झाले होते.

Shivjal