पर्यावरण मंत्रालयाची स्वच्छता मोहिम; कृष्णा, मुळा- मुठा नद्या होणार स्वच्छ

नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील 19 राज्यातील 48 नद्या व समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कृष्णा, मुळा-मुठा नद्या आणि मिऱ्या व गणपतीपुळे समुद्र किनारे यांचा या मोहिमेत समावेश आहे.

Loading...

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने 19 राज्यातील 24 नद्या आणि 24 समुद्र किनारे स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कृष्णा व मुळा-मुठा या नद्या आहेत, तर रत्नागिरी जिल्ह्यातील मिऱ्या व गणपतीपुळे या समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे.

9 राज्यातील 24 नद्या आणि 24 समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 19 टीम बनविल्या आहेत. यामध्ये केंद्रीय पर्यावरण, वने, हवामान बदल विभागाचे वरीष्ठ अधिकारी, राज्यातील नोडल एजन्सी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे, जिल्हा प्रशासन, समुद्र किनारी असणारे मत्स्य महाविद्यालय तसेच अन्य शैक्षणिक, संशोधन संस्थांचाही यात समावेश आहे. या टीम स्थानिक शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, स्थानिक समूहांना सोबत घेऊन स्वच्छता मोहिम राबविणार आहेत. या मोहिमेसाठी पर्यावरण विभागाने इको क्लब शाळेचा सहभाग घेतला आहे. विभागाच्या वतीने राष्ट्रीय हरीत कॉर्प्स कार्यक्रमांतर्गत या मोहिमेसाठी आर्थिक मदत पुरविली जाणार आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...