201४ मध्ये लॉलीपॉप दाखवून भाजपचा विजय, मात्र आता लाट ओसरली – रामदास कदम

औरंगाबाद: २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांत भाजपने लॉलीपॉप दाखवून भाजपने विजय मिळवला. मात्र, आता मोदी लाट ओसरली असून भाजपची उलटगिनती सुरु झाल्याची टीका पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून भाजपच्या नेत्यांना खून आणि बलात्कारासारख्या प्रकरणांत अटक केली जात असल्याने हे सरकार शिवशाही नाहीतर गुंडशाहीचे असल्याचा घणाघात त्यांनी केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाजपला चांगलेच टार्गेट केल. भाजपने मोठमोठ्या गुंडांना पक्षात घेवून आमदार- खासदार केले त्यामुळे भाजप नेत्यांना खून, बलात्कारांच्या आरोपात अटक होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

You might also like
Comments
Loading...