यावेळेस धोक्याने पराभव झाला, इथून पुढे राज्य भाजपमय केल्याशिवाय राहणार नाही : फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मतं मिळूनही सत्तेपासून दूर राहावे लागले. त्यामुळे येत्या काळात आपलंच सरकार येईल आणि एकदा सरकार आले की संपूर्ण महाराष्ट्र भाजमय होऊन जाईल, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. इंदापुर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. यावेळी विजयसिंह मोहीते-पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सुभाष देशमुख, आदी नेते उपस्थित होते.

ते म्हणाले की, हर्षवर्धन पाटील आणि माझादेखील अपघाताने पराभव झाला आहे. पण काळजी करण्याचे कारण नाही, फार काळ कोणी आपल्याला मागे ठेऊ शकत नाही. मात्र आत्ता आपण धोक्याने बाहेर राहिलो आहोत. ईश्वराचा संकेत आहे की संपूर्ण महाराष्ट्र हा भाजपामय करा. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र भाजपामय केल्याशिवाय राहणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

Loading...

दरम्यान राज्याच्या चाळीस वर्षांच्या इतिहासात भाजपने ७० टक्के जागा जिंकून सुद्धा मित्रपक्षाने जनादेशाचा विश्वासघात केला. ४० टक्के अल्पमत असणारे तीन पक्ष एकत्र आले. मात्र हे सरकार फार काळ टिकणार नाही. भाजपला ते फार काळ सत्तेपासून दूर ठेवू शकत नाही. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वच्या बातम्या

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की