शाहिदच्या घरात नवीन पाहुण्याची एन्ट्री…..

0

काल शहीद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी एका गोंडस बाळाचा जन्म झाला. मीरा व शाहिद दुसऱ्यांदा आई-बाबा झालेत. साहजिकच कपूर आणि राजपूत कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. बॉलिवूडमधूनही शाहिद व मीरावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दुसरीकडे शाहिद व मीराच्या या दुस-या बाळाचे नाव काय असणार, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीराने काही महिन्यांपूर्वी चाहत्यांना सोशल मीडियावर एक ‘गुड न्यूज’ दिली होती. सोशल मीडियावर त्यांनी मीशाचा फोटो शेअर करत त्यावर ‘बिग सिस्टर’ असे कॅप्शन दिले होते.

मीराला सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी चाहत्यांकडून तिला मुलगा हवाय की मुलगी, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा मीरा मला मुलगा असो किंवा मुलगी मी दोघांत फरक करत नसल्याचे म्हणाली होती. तिच्या या बाळाच्या रूपाने मिशाला छोटा भाऊ मिळाला आहे. शाहिद आणि मीराच्या घरी या लहानग्याच्या आगमनामुळे बॉलिवूडकरांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आलिया भट्टनेही सोशल मीडियावर या दोघांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. शाहिदने काही दिवसांसाठी कामाच्या व्यापातून सुट्टी घेतली आहे. लहान पाहुण्याच्या आगमनाने दोघेही खूप आनंदी आहेत.

You might also like