राखी सावंतचे ठरले लग्न , बघा कोण आहे मुलगा…

0

आपल्या बोल्ड आणि भडक विधाना करिता नेहमी चर्चेत राहते. या अगोदर राखी सावंत यांनी स्वतःचे स्वयंमवर ठेवले होते. टॉरंटोमधील इलेश पारूजानवालाला पसंत केले होते. त्याच्यासोबत साखरपुडा सुद्धा केला होता. परंतु. त्यानंतर राखीनं हा साखरपुडा मोडला होता. आता तिने परत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. बघूया कोण आहे हा मुलगा खासरेवर

लग्नाची तारीख हि ३१ डिसेम्बर दोघांनी ठरवली आहे. तर मुलाचे नाव आहे दीपक कलाल, दीपक हा आपल्या फनी व्हिडीओ करिता सर्वत्र सोशल मिडीयावर प्रसिद्ध आहे. या अगोदर तो अनेक विवादित वाक्य बोलून वादात देखील अडकला होता. ३१ डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहे. राखीनं तिच्या इन्स्टाग्रामवर वेडिंग कार्ड शेअर करून याची माहिती दिली आहे.

‘कुटुंबासह लग्नाला यायचं हं’…असं आवाहन केलं आहे. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी लॉस एन्जलिस या ठिकाणी दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत. दीपक कलाल यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर करून राखी सावंतला प्रपोज केले होते. राखीनंही इन्स्टाग्रामवरून हा व्हिडिओ शेअर करून प्रपोजल स्वीकारलं होतं. राखीनं आता आणखी एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात राखी आणि दीपक कलाल लग्नाचे निमंत्रण देताना दिसत आहेत.

सोशल मिडीयावर नेहमी वादळ उठवत राहणारे दोघे आता या लग्नातून काय वादळ उठवतात हे बघायला सगळ्यांना उस्तुकता आहे. दीपक कलालसोबत ती बोहल्यावर चढणार आहे हा एक चर्चेचा विषय ठरला आहे.

चला तर लागा तयारीला लवकरच दीपिका रणवीर , प्रियंका जोन्स नंतर आता राखी सावंत मिडीयावर लग्नाच्या तयारीत दिसणार आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

You might also like