समलैंगिक संबंधांना परवानगी; सोनम कपूरचे डोळे पाणावले

0

समलिंगी संबंध गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 बाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. ‘समलैंगिकता हा गुन्हा नाही’, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला आहे.  या निर्णयाचे बॉलिवूडमधील दिग्गजांनी स्वागत केले असून सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर-आहुजा हिने यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, या निर्णयाने माझ्या डोळ्यात आनंदअश्रू आल्याचे म्हटले आहे.

सोनमने ट्वीट करत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले. ‘जेथे मला राहायला आवडते तोच हा देश आहे. कोणीही एकमेकांचा तिरस्कार करत नाही. अशाच देशावर माझे प्रेम आहे’, असे ट्वीट तिने केले.

त्यानंतर दुसऱ्या ट्वीटमध्ये तिने या निर्णयामुळे माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याचे ती म्हणाली. आता कोणतेही लेबल नसेल, आता आपण एका आदर्श जगात राहू शकू आणि हा तोच देश आहे जिथे आम्हाला रहायचे आहे.

You might also like