ऐतिहासिक निकाल!! आज खूप अभिमान वाटतोय – करण जोहर

0

समलिंगी संबंध गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 बाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. ‘समलैंगिकता हा गुन्हा नाही’, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर बॉलिवूडचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनेही ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘ऐतिहासिक निकाल!! आज खूप अभिमान वाटतोय! समलैंगिकतेला गुन्हेगारीच्या कक्षेबाहेर करणं आणि कलम 377 रद्द करणं ही मानवता आणि समान हक्कांसाठी मोठी बाब आहे. देशाने पुन्हा ऑक्सिजन मिळवला.’ असं ट्विट करण जोहरने केलं आहे.

You might also like