शिक्षणामुळे प्रत्येकाच्या जीवनात समृध्दी – आ. बाळासाहेब थोरात

अहमदनगर : फुले, शाहु, आंबेडकरांची विचारधारा लाभलेल्या महाराष्ट्रात सह्याद्री शिक्षण संस्थेने अनेक गुणवंत विद्यार्थी महाराष्ट्राला दिले आहेत.यामध्ये जनता विद्यालयाची वाटचाल ही कायम उल्लेखनीय राहिली आहे.जागतिकीकरणात शिक्षणाचा परिघ आणखी वाढविणे गरजेचे असून शिक्षणामुळे प्रत्येकाच्या जीवनात समृध्दी आली असल्याचे गौरवोद्गार माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

संगमनेर तालुक्यातील वडगांव पान येथे डी.के. मोरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आ.डॉ.सुधीर तांबे हे होते. यावेळी परिसस्पर्श या स्मरणिकेचे प्रकाशन तसेच या शाळेच्या माजी मुख्याध्यापकांचा सत्कार ही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.आमदार थोरात म्हणाले की, सह्याद्री संस्थेच्या उभारणीत स्व.सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात,दत्ताजी मोरे यांसह जुन्या पिढीतील धुरिणांचे मोठे योगदान राहिले आहे.ग्रामीण भागात खेडोपाडी विद्यालये सुरु झाल्याने अनेक विद्यार्थी विशेषत: विद्यार्थीनींनी शिक्षण घेतले.

या संस्थेने व शाळेने अनेक गुणवंत विद्यार्थी रायाला दिले.शिक्षणापासून ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबात समृध्दी आली आहे.जागतिकीकरणात शिक्षणाचा परिघ वाढून संशोधन क्षेत्रात विद्यार्थ्यांनी गेले पाहिजे. संगमनेर तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेमुळे रायात आपला शैक्षणिक केंद्र म्हणून नवा लौकीक निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांंनी मानवता हा धर्म जोपासला पाहिजे.

समानता हा देशाच्या प्रगतीचा मुख्य पाया असून आपला देश, राय, तालुका परिसर यांचा समृध्द इतिहासाचा अभिमान बाळगला पाहिजे. प्रतापराव मोरे यांनी संस्थेच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले असून जनता विद्यालयाने आपली शैक्षणिक गुणवत्तेतून मोठी ओळख निर्माण केली असल्याचे ते म्हणाले.

You might also like
Comments
Loading...