fbpx

सरकारी कार्यालयातून इंग्रजी हद्दपार; मराठी सक्तीचा आदेश

मुंबई – सरकारी कार्यालयांत इंग्रजीचा वापर बंद करून प्रशासनात मराठी सक्तीचा आदेश राज्य सरकारने सोमवारी काढला. प्रत्येक कार्यालयात आता मराठी अनिर्वाय केली जाणार आहे. तसेच मराठीचा पूर्ण वापर होतो का, हे पाहण्यासाठी मराठी भाषा दक्षता अधिकारी नेमण्याचे देखील सरकारकडून आदेशही देण्यात आले आहेत.नव्या आदेशानुसार योजनांची माहिती सामान्यांना देताना वा त्याची चर्चा करताना तसेच दूरध्वनीवरून बोलताना सर्व अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी मराठीचाच वापर करणे बंधनकारक असेल.

वारंवार सूचना देऊनही ज्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मराठीचा वापर करण्याबाबत सुधारणा होत नाही, त्यांना लेखी ताकद देणे, गोपनीय अहवालात तशी नोंद करणे, एक वर्षासाठी बढती वा वेतनवाढ रोखणे, अशी कारवाई केली जाणार आहे. या कारवाईचा शासकीय आदेश आधीपासूनच आहे. आता त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं.

दरम्यान यापूर्वी राज्यात मराठी भाषा सक्तीची करण्यात यावी अशी आग्रही भूमिका मनसेनं घेतली होती. त्यासाठी वारंवार मनसेच्या वतीनं आंदोलने देखील करण्यात आली होती.