भारताविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या ‘या’ प्रमुख खेळाडूंचे पुनरागमन

मुंबई : पुढील महिन्यात भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आली. डब्ल्युटीसी स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला या सामन्यापासून सुरु होणार आहे. भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ चांगली सुरुवात करण्यास उत्सुक आहेत.

भारताविरुद्धची मालिकेत इंग्लंडच्या संघातील अनेक खेळाडूंनी पुनरागमन केले आहे. यात भारतात आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापत झालेला बेन स्टोक्स, न्युझीलंडविरुद्धच्या मालिकेपुर्वी संघाबाहेर झालेला जोस बटलर यांचा समावेश आहे. तसेच यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो आणि सॅम करण यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा अव्वल दर्जाचा संघ खेळायला उतरणार आहे. या संघाचे नेतृत्व जो रुटकडे देण्यात आले आहे. तर गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे करतील.

यावर्षी फेब्रुवारी -मार्च महिन्यात भारतात झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. तसेच भारताविरुद्धची मालिका इंग्लंडच्या संघासाठी दोन प्रकारे महत्वाची आहे. कारण भारताविरुद्धच्या मालिकेद्वारे जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ होत आहे. तसेच आगामी डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अॅशेज मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारताच्या मालिकेकडे पुर्वतयारी म्हणून बघत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP