इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूने बुमराहला हरवत जिंकला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार 

bumrah

नवी दिल्ली : इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने नवा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटला महिन्याचा सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे. आणि महिलांमध्ये आयर्लंडची अष्टपैलू एमियर रिचर्डसनची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आयसीसीने या वेळी दोन्ही पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंचे नाव ट्विटरवर अतिशय मजेदार पोस्टद्वारे जाहीर केले.

भारताविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेतील चमकदार फलंदाजीमुळे तसेच भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांना मागे टाकत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने ऑगस्टमध्ये प्लेअर ऑफ द मंथ खेळाडूचा पुरस्कार जिंकला. महिला विभागात आयर्लंडची अष्टपैलू एमियर रिचर्डसला प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले.

रूटने ऑगस्टमध्ये भारताविरुद्ध तीन कसोटींमध्ये तीन शतकांसह 507 धावा केल्या. या कामगिरीमुळे त्याने आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतही अव्वल स्थान मिळवले. भारतीय संघातील कोविड -१९ प्रकरणांमुळे पाचवी आणि शेवटची कसोटी रद्द करावी लागली तेव्हा पाच सामन्यांची कसोटी मालिका संपुष्टात आली.

महत्वाच्या बातम्या :