पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, महत्वाचे दोन खेळाडू बाहेर

मुंबई : मागील महिन्यात आयसीसीची पहिलीवहिली जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धा संपुष्टात आली. यानंतर आयसीसीने पुढील स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासुन भारतीय संघाच्या नव्या प्रवासाला सुरुवात होणार आहे.

भारताविरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी इंग्लंडने संघाची घोषणा केली आहे. यात इंग्लंडच्या संघाचे दोन प्रमुख खेळाडू संघाबाहेर झाले आहे. यात पहिले नाव आहे ख्रिस वोक्सचे. दुखापतीमुळे ख्रिस वोक्सला संघात स्थान देण्यात आलेले नाही. तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरही अद्याप दुखापतीतुन पुर्णपणे सावरला नसल्याने त्यालाही संघातुन वगळण्यात आले आहे.

यावर्षी भारतात सुरु असलेल्या मालिकेत जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर त्याने भारतातील आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. तसेच यादरम्यान त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने काउंटी क्रिकेटमध्ये फिटनेस सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी तो पुर्णपणे फिट नसल्यामुळे त्याला संघातुन वगळण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP