नाणेफेक जिंकत इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात केवळ एक फिरकीपटू

मुंबई : भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताकडून चार वेगवान गोलंदाज आणि केवळ एक फिरकीपटूला खेळवण्यात येत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सर्वांना सलामीला कोण खेळणार याचे कोडे पडले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाची घोषणा होताच हे स्पष्ट झाले की रोहित शर्मासोबत के एल राहुल सलामीला खेळणार आहे. तर डब्ल्युटीसी स्पर्धेतील अपयशानंतर पुजाराचे संघातील स्थान अबाधीत राहीले आहे. चौथ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली आणि पाचव्या क्रमांकावर उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा आहे.

रहाणेनंतर सहाव्या क्रमांकावर यष्टीरक्षक रिषभ पंत त्यानंतर रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना संघात स्थान देण्यात आले आहे. डब्ल्युटीसी सामन्यातील इशांत शर्मा आणि आर अश्विनला मात्र संघातून वगळण्यात आले आहे. तर इंग्लंडच्या संघात ओली रॉबीन्सन, जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो यांचे पुनरागमन झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या