थरारक सामन्यात न्यूझीलंडला हरवत इंग्लंड बनला ‘विश्वविजेता’

टीम महाराष्ट्र देशा :  वर्ल्ड कप २०१९ मध्ये अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर सुपर ओवरमध्ये विजय मिळवत इंग्लंडने विजेतेपद मिळवले आहे. इंग्लंडने इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला आहे. तर न्यूझीलंडचा फायनलमधील सलग दुसरा पराभव आहे.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारित ५० षटकात 8 विकेट गमावत इंग्लंडसमोर २४२ धावांचे लक्ष्य ठेवले. परंतु, इंग्लंडचा संघही ५० षटकांत २४१ धावाच करु शकला त्यामुळे सामना बरोबरीत राहिला. त्यानंतर विश्वचषकाचा विजेता ठरवण्यासाठी सुपर ओव्हरही खेळवावी लागली. सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाली. मात्र, इंग्लंडने दोन चौकार मारलेले असल्याने इंग्लंड विश्वविजेता ठरला.

Loading...

२४२ धावांचा पाठलाग करताना इंग्लडकडून बेन स्टोक्सने नाबाद ८४ धावांची तुफान खेळी केली. जॉस बटलरने देखील त्याला साथ देत ५९ धावांची खेळी केली. न्यूझीलंडच्या लोकी फर्गुसन आणि जेम्स नीशम यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तसेच न्यूझीलंडकडून हेनरी निकोलने ५५ तर टॉम लॅथमने ४७ धावांची खेळी केली. तसेच न्यूझीलंडचे गोलंदाज क्रिस वोकर आणि लियाम प्लंकेट यांनी देखील इंग्लंडच्या प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
आता सुप्रिया ताईंना 'सेल्फी विथ खड्डे'चा विसर पडला आहे का?