‘या’ कारणामुळे इंग्लंडचे खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध

मुंबई : यावर्षी मे महिन्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने ही स्पर्धा स्थगीत केली. यानंतर बीसीसीआयने उर्वरीत स्पर्धा ही युएई येथे आयोजीत करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यादरम्यान इंग्लंडचे खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध नसतील असे सांगण्यात आले होते.

कारण भारताविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर इंग्लंडचा संघ हा बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार होता. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आगामी बांग्लादेशविरुद्धची मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे इंग्लंडचे खेळाडू हे आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरीत हंगामात सहभाग नोंदवू शकणार आहे. यापुर्वी न्युझीलंडच्या क्रिकेट बोर्डाने देखील संघाच्या प्रमुख खेळाडुंना आयपीएल खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.

यामुळे भारताविरुद्धची कसोटी मालिक संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघ आणि इंग्लंडचे खेळाडू दोन्ही आयपीएल स्पर्धेसाठी एकाच विमानाने दुबईला रवाना होतील. यूएईमध्ये १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. तर भारतीय संघाला इंग्लंडमध्ये १० ते १४ सप्टेंबर दरम्यान शेवटचा कसोटी सामना खेळायचा आहे. या सामन्यानंतर भारतीय संघ थेट दुबईला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या