मुंबई : इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार इऑन मॉर्गन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. मॉर्गन गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे आणि यामुळे तो क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. इऑन मॉर्गनचा फॉर्म गेल्या काही काळापासून चांगला नसल्यामुळे त्याच्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
मॉर्गनने १६ टी-२० सामन्यांमध्ये १६.६७च्या सरासरीने फक्त १५० धावा केल्या. याशिवाय नेदरलँड्सविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली. एकीकडे इतर फलंदाज भरघोस धावा काढत असताना मॉर्गन मात्र वाईटरित्या फ्लॉप होत होता. द गार्डियनच्या बातमीनुसार, इऑन मॉर्गन निवृत्तीची घोषणा करू शकतो. नेदरलँड्स दौऱ्यापूर्वी तो म्हणाला होता. की आता वय त्याच्यावर अवलंबून आहे आणि सामना खेळल्यानंतर शारीरिकदृष्ट्या सावरण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागेल.
Eoin Morgan is set to retire from International this week due to poor form and injuries. (Source – The Guardian)
— Johns. (@CricCrazyJohns) June 27, 2022
स्काय स्पोर्ट्सशी संवाद साधताना मॉर्गन म्हणाला, ”मी संघासाठी योगदान देऊ शकत नाही असे मला वाटत असेल तर मी निवृत्ती जाहीर करेन.” याआधी इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयने आपल्या कर्णधाराला पूर्ण साथ दिली. तो म्हणाला होता, ”मॉर्गन हा आमच्या संघाचा कर्णधार आहे आणि संघाचा विजय त्याच्यासाठी त्याच्या स्वत:च्या धावसंख्येपेक्षा अधिक महत्त्वाचा असतो.”
महत्त्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<