इंग्लंडनं पटकावला अंडर-17 फिफा विश्वचषक

fifa-under-spain-world-cup-final-england7

कोलकाता-फिफा वर्ल्ड कप (१७ वर्षांखालील) या जागतिक स्तरावरील मानाच्या फुटबॉल स्पर्धेला नवा चॅम्पियन शनिवारी मिळाला. इंग्लंडने कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या अजिंक्यपदाच्या लढतीत स्पेनचा ५-२ अशा फरकाने धुव्वा उडवत पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकण्याची करामत केली. याचसोबत क्रोएशिया येथे मे महिन्यात झालेल्या युरो १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा वचपाही काढला. स्पेनला चौथ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. याआधी दोन्ही संघांना एकदाही या स्पर्धेचे जेतेपद पटकावता आले नव्हते.

_8ba79286-bbff-11e7-970b-e502f534a12e
या अंतिम सामन्यात सर्जिओ गोमेझनं १०व्या आणि ३१व्या मिनिटाला एकेक गोल डागून स्पेनला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. पण रियान ब्रूस्टरनं ४४व्या मिनिटाला झळकावलेल्या गोलनं इंग्लंडला या सामन्यात कमबॅक करण्याची संधी मिळवून दिली. मग उत्तरार्धात मॉर्गन गिब्स व्हाईटनं ५८व्या इंग्लंडला बरोबरी साधून दिली. त्यानंतर फिलिप फोडेननं ६९व्या आणि ८८व्या मिनिटाला, तर मार्क गिहीनं ८४व्या मिनिटाला केलेल्या गोल्सनी इंग्लंडला ५-२ असा शानदार विजय मिळवून दिला.स्पेननं याच वर्षी इंग्लंडवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात करून अंडर सेव्हन्टिन युरोपियन विजेतेपद पटकावलं होतं. इंग्लंडनं अंडर सेव्हन्टिन फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये त्या पराभवाचा वचपा काढला.

Loading...

पारितोषिक वीर
गोल्डन बूट-रिहान ब्रिस्टर (इंग्लंड)
गोल्डन ग्लोव्हज-गॅब्रियल ब्रॅझॅओ (ब्राझील)
गोल्डन बॉल-फिलीप फोडेन (इंग्लंड)
फेअर प्ले ट्रॉफी-ब्राझील

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार