FIFA World Cup 2018: इंग्लंडने ट्युनिशियाला २-१ चारली धूळ

fifa 2018

वोल्गोग्राड- वोल्गोग्राड च्या मैदानवर खेळल्या गेलेल्या फिफा विश्वचषकाच्या इंग्लंड आणि ट्युनिशिया यांच्यात झालेल्या सामन्यात इंग्लंडने ट्युनिशियावर विजय मिळवला. जी गटातील या दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता. इंग्लंडच्या हॅरी केन याने महत्तवाची भूमिका बजावत या सामन्यात २ गोल केले. केनने ११व्या आणि ९१व्या मिनिटाला गोल करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. ट्युनिशियाने पहिल्यांदा आक्रमक खेळ करत इंग्लडला रोखण्याचा प्रयत्न केला.

Loading...

मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत होते. मात्र स्ट्रायकर हॅरी केन सामन्यात इंग्लंडकडून ११व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर इंग्लंडचा खेळाडू वॉकर याच्या चुकीमुळे ट्युनिशियाला पेनल्टीवर गोल करण्याची संधी दिली. या संधीचे सोने करत मिडफिल्डर फर्जानी आसी याने गोल करून सामना बरोबरीत आणला होता. फुटबाल चाहत्यांचे या सामन्यावर जवळून लक्ष होते. या सामन्यात अखेर इंग्लान्द्नेच बाजी मारली.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...