अभियांत्रिकी माजी विद्यार्थी संघटनेची नवी कार्यकारिणी घोषित

औरंंगाबाद : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबादच्या माजी विद्यार्थी संघटनेची वार्षिक निवडणुक शनिवार दि.२० रोजी सर्वसंमतीने बिनविरोध पार पडली. प्रसिद्ध उद्योजक नितीन सोमाणी यांची अध्यक्षपदी तर सामाजिक कार्यकर्ते लेखक प्रकाशक श्रीकांत उमरीकर यांची सचिवपदी निवड करण्यात आली.

नविन कार्यकारिणीत सुधीर बोंडेकर (उपाध्यक्ष), सुधीर शिरडकर (कोषाध्यक्ष), गिरीश लोया (सहसचिव), डॉ.उत्तम काळवणे (सहकोषाध्यक्ष), मेजर सईदा फिरासत (महिला प्रतिनिधी), मकरंद राजेंद्र (जनसंपर्क अधिकारी) म्हणून काम पाहणार आहेत. गरजू विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम गेली ७ वर्षे यशस्वीरित्या चालू आहे. तो पुढेही चालू राहिल तसेच संघटनेची इमारत, विविध उपक्रमांना चालना, उद्योग जगताशी सुसंवाद निर्माण होईल असा निर्धार नुतन अध्यक्ष नितीन सोमाणी यांनी व्यक्त केला.

नविन कार्यकारिणीत प्राचार्य प्राणेश मुरनाळ, अजीत सौंदलगीकर (माजी अध्यक्ष), डॉ.नितीन भस्मे, सुरेश तांदळे, रंगनाथ चव्हाण, आशिष अग्रवाल, रविंद्र गायकवाड, डॉ.संजय शिंदे (प्राध्यापक प्रतिनिधी), प्रा.विवेक क्षीरसागर (प्राध्यापक प्रतिनिधी), सुरेंद्र पाटील, सुमेधा बोर्डे, किरण यंबल, चंद्रशेखर पालवणकर, प्रशांत नानकर, अद्वैत कुलकर्णी, अमृत संघई (मुंबई प्रतिनिधी), संदीपान रेड्डी (मुंबई प्रतिनिधी), दीपक माहुरकर (पुणे प्रतिनिधी), अजय शिंदे (पुणे प्रतिनिधी) यांचा समावेश करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या