मुंबई : इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडला (ENG vs NZ) मोठा धक्का बसला आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंडच्या दोन खेळाडूंसह तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी सकाळी न्यूझीलंड क्रिकेटने याला दुजोरा दिला. ससेक्स आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टूर सामना शुक्रवारपासून खेळवला जाणार आहे. किवी संघ सध्या ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २ जूनपासून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे.
न्यूझीलंडचा कसोटी संघ सध्या ब्राइटनमध्ये आहे. न्यूझीलंड क्रिकेटने सांगितले, ”ब्राइटनमध्ये ससेक्सविरुद्धच्या पहिल्या टूर सामन्याच्या सकाळी आमच्या कॅम्पमधील तीन सदस्यांना कोविड-१९ ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. दोन क्रिकेटपटू हेनरी निकोल्स आणि ब्लेयर टिकनर व्यतिरिक्त, गोलंदाजी प्रशिक्षक शेन जर्गेन्सन यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर सर्वांना ५ दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.”
”संघातील या तीन सदस्यांव्यतिरिक्त उर्वरित सर्व लोकांचा कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ससेक्सविरुद्धच्या दौऱ्यात कोणताही बदल होणार नाही”, असे न्यूझीलंड क्रिकेटने सांगितले. टिकनर आणि निकोल्स हे २० जणांच्या न्यूझीलंड संघाचे भाग आहेत जे इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ २ जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे.
न्यूझीलंड कसोटी संघ:
केन विल्यमसन (कप्तान), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, कॉलिन डी ग्रँडहोम, जेकब डफी, कॅमेरॉन फ्लेचर, मॅट हेन्री, काइल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स , एजाज पटेल, रचिन रवींद्र, हमिश रुदरफोर्ड, टिम साऊदी, ब्लेअर टिकनर, नील वॅगनर, विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com