मुंबई : स्टार फलंदाज जो रूट सध्या न्यूझीलंडविरुद्ध (ENG vs NZ) मालिका खेळत असलेल्या इंग्लंडच्या कसोटी संघाचा भाग आहे. मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जो रूट स्कूप शॉटद्वारे षटकार मारताना दिसत आहे. त्याचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेटनेही शेअर केला आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरच्या चेंडूवर रिव्हर्स स्कूपद्वारे शानदार षटकार ठोकला. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याने वॅगनरच्या चेंडूवर हा फटका खेळला. चेंडू थेट षटकारासाठी थर्ड मॅनच्या दिशेने गेला. इंग्लंड क्रिकेटने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओला आतापर्यंत १५ हजारांहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे.
Joe Root. You are ridiculous.
Scorecard/clips: https://t.co/AIVHwaRwQv
🏴 #ENGvNZ 🇳🇿 pic.twitter.com/0YIhsZ5T04
— England Cricket (@englandcricket) June 26, 2022
कर्णधारपद सोडल्यापासून रूट उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. नुकताच तो कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज बनला आहे. लीड्समधील हेडिंग्ले येथे झालेल्या या कसोटी सामन्यात इंग्लंडने चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात २ बाद १८३ धावा केल्या. न्यूझीलंडने पहिल्या डावात ३२९ धावा केल्या, त्यानंतर यजमानांनी ३६० धावा केल्या. यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ३२६ धावा करत इंग्लंडला विजयासाठी २९६ धावांचे लक्ष्य दिले.
महत्त्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<