मुंबई : इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममधून जात आहे. आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक धावा केल्यानंतर त्याची बॅट त्याच्या राष्ट्रीय संघासाठीही जोरदार तळपते आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील (ENG vs NED) अंतिम सामना बुधवारी नेदरलँड्स आणि इंग्लंड यांच्यात अॅमस्टेलवीन येथील क्रिकेट मैदानावर खेळला गेला. या सामन्यातही बटलरने नाबाद अर्धशतक झळकावले. आपल्या खेळीदरम्यान, बटलरने खेळपट्टीबाहेर पडलेल्या चेंडूवर षटकार ठोकला.
इंग्लंडच्या डावातील २९वे षटक टाकण्यासाठी आलेला नेदरलँड्सचा वेगवान गोलंदाज पॉल व्हॅन मीकेरेनने पाचव्या चेंडूचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू खेळपट्टीपासून दोन फूट बाहेर गेला, बटलरने याचा फायदा घेत षटकार मारला.
just @josbuttler things❤️🔥🐐 pic.twitter.com/MpqIoGrh9a
— Nathish Adhiyan (@NathishAdhiyan) June 22, 2022
इंग्लंडने नेदरलँड्सविरुद्धचे पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून मालिकेत आधीच अजेय आघाडी घेतली होती. तिसर्या वनडेतही इंग्लिश संघ जिंकेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती आणि तसेच घडले. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. नेदरलँड्सकडून तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली, पण एकालाही याचे शतकात रुपांतर करता आले नाही. यामुळे संघाला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांनी ४९.२ षटकात सर्व गडी गमावून २४४ धावा केल्या. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने सर्वाधिक ६४ धावांची खेळी खेळली.
लक्ष्याचा पाठलाग करताना जेसन रॉय आणि फिल सॉल्ट या सलामीच्या जोडीने इंग्लंडला ८५ धावांची सुरुवात करून दिली. यानंतर डेव्हिड मलानला खातेही उघडता आले नाही. येथून रॉय आणि बटलरने जबरदस्त फलंदाजी करत तिसऱ्या विकेटसाठी १६३ धावांची भागीदारी करून आपल्या संघाला ७ विकेटने विजय मिळवून दिला. रॉयने १०१ धावांची नाबाद खेळी खेळली. बटलर ८६ धावा करून नाबाद राहिला. अशा प्रकारे इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली.
महत्त्वाच्या बातम्या –