मुंबई : ऋषभ पंतने मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात नाबाद शतक ठोकले. या दमदार कामगिरीमुळे त्याने टीकाकारांना चांगलेच उत्तर दिले आहे. पंतने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिलेच शतक झळकावले आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने पंतच्या खेळीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. झहीर म्हणाला की पंतने त्याच्या फटकेबाजीसाठी अचूक गोलंदाजांची निवड केली. पंतने या सामन्यात १२५ धावांची नाबाद शतकीय खेळी खेळली. त्याच्या या कामगिरीचे अनेकांनी कौतुक केले आहे.
क्रिकबझशी बोलताना झहीर म्हणाला की, ‘जेव्हा तुमच्यात आक्रमक प्रवृत्ती असते तेव्हा या गोष्टी (गहाळ स्टंपिंगसारख्या) घडतात. पण त्याने आपली खेळी कशी उभारली हा औत्सुक्याचा विषय होता. एकदा भागीदारी सुरू झाली की, तुम्हाला गोलंदाजांवर दबाव आणावा लागतो. तो आपल्या शॉट खेळण्यासाठी गोलंदाजांची निवड करण्यात हुशारी दाखवली. या सामन्यातील खेळी दरम्यान पंत खूप कमी वेळा आक्रमक पाहायला मिळाला. त्याने संपूर्ण सामन्यात एकदम सावधगिरीने तसेच हुशारीने फलंदाजी केली. आणि त्यामुळेच संघाला विजय मिळवून देण्यात त्याला यश आले.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर ऋषभ पंतला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याच्या व्यतिरिक्त हार्दिक पांड्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. अशा प्रकारे टीम इंडियाचे दोन खेळाडू मालिकेच्या शेवटी अव्वल स्थानावर राहिले. पंड्या आणि पंत यांनी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतकी भागीदारी करत भारतीय संघाला विजयापर्यंत नेले होते. पंत १२५ धावांवर नाबाद राहिला. पंड्याने अर्धशतक झळकावण्यासोबतच ४ बळी घेण्यातही यश मिळविले होते.
पंड्याबाबत झहीर म्हणाला की, ‘सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट म्हणजे त्याने टाकलेल्या षटकांची संख्या. जर त्याला गोलंदाजी-फिट वाटत असेल तर तो अधिक सामने खेळू शकेल आणि बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये योगदान देऊ शकेल. तुमची फिटनेस तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्पर्धा करण्यासाठी खूप मजबूत स्थितीत ठेवते. हार्दिक भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे. भारतीय संघाने अंतिम एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा ५ गडी राखून पराभव करत मालिका २-१ अशी जिंकली. भारतीय संघाने टी-२० मालिकाही २-१ अशी जिंकली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Ben Stokes : ‘या’ कारणामुळे घेतली बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती; म्हणाला,’मी माझे शंभर टक्के…’
- Monkeypox case | देशात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण; आरोग्य सेवा सतर्क
- Sanjay Raut : लोकसभेत गट निर्माण केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल; संजय राऊतांचा खासदारांना इशारा
- Sanjay Raut : फुटीर गट शिवसेनेची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करू शकतात?; संजय राऊत आक्रमक
- Anu Agrawal | आशिकी गर्ल अनु अग्रवाल यांनी शेयर केला ‘या’ दिग्गज अभिनेत्यासोबतचा जुना फोटो
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<