मुंबई : भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर मालिकेतील पाचवा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या होत्या. उपकर्णधार ऋषभ पंतने १४६ धावांचे योगदान दिले तर रवींद्र जडेजाने १०४ धावा केल्या. दुसरा दिवस सुरू होण्यापूर्वी, मैदानावरील प्रेक्षकांसह, खेळाडूंनीही खास हेतूसाठी निळी कॅप परिधान केली आणि इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज बॉब विलिस यांच्या स्मरणार्थ ४५ सेकंदांसाठी टाळ्या वाजवल्या.
या कॅपचे कनेक्शन विलिसशीच आहे. प्रोस्टेट कर्करोगाने त्यांचे निधन झाले. तेव्हापासून या आजारावर उपचार, चाचणी आणि लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने त्यांच्या नावाने बॉब विलिस फंड तयार करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत एजबॅस्टन येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान प्रोस्टेट कर्करोग संशोधनासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने खेळाडू आणि प्रेक्षकांनीही ही खास निळी टोपी परिधान केली होती.
India and England players wearing blue caps to raise awareness against Prostate cancer on Bob Willis day. Money is being raised in support of the Bob Willis Fund.#ENGvIND pic.twitter.com/fPyh7lVkxd
— Subhayan Chakraborty (@CricSubhayan) July 2, 2022
७० वर्षीय विलिस यांचा डिसेंबर २०१९ मध्ये प्रोस्टेट कर्करोगाने मृत्यू झाला. तेव्हापासून या आजारावर उपचार आणि संशोधनासाठी #BlueForBob मोहीम इंग्लंडमध्ये सुरू आहे. गेल्या वर्षीही जेव्हा पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आला होता, तेव्हा एका वनडेमध्येही दोन्ही संघांच्या खेळाडूंनी टोप्या घातल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<