मुंबई : भारतीय संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा दारुण पराभव केला. या सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी नव्या विक्रमाला गवसणी घातली. शेवटच्या एकदिवसीय सामन्यातील विजयासह रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडमध्ये एकदिवसीय आणि टी-२० मालिका जिंकणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार बनला आहे.
मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने १९९० मध्ये इंग्लंडमध्ये पहिल्यांदा एकदिवसीय मालिका जिंकली होती. यानंतर भारतीय संघाने २०१४ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली हा पराक्रम केला होता. त्यानंतर आता या दिग्गज कर्णधारांच्या यादीत रोहित शर्माही सामील झाला आहे. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून रोहित शर्माची विजयाची टक्केवारी ८१.२५ अशी आहे. तर टी-२० मध्ये ८३.८७ आणि कसोटी फॉरमॅटमध्ये १०० टक्के आहे.
ऋषभ पंतच्या नावावरही विक्रमाची नोंद
रोहित शर्माशिवाय भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनेही एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून शतक झळकावणारा तो तिसरा यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. एमएस धोनीने २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदा अशी कामगिरी केली होती. त्यावेळी धोनीने १८३ धावा ठोकल्या होत्या. या यादीत ऋषभ पंत आता १२५ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तिसऱ्या स्थानावर राहुल द्रविडचे नाव आहे. द्रविडने २००२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १०९ खेळी खेळली होती.
भारतीय संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम खेळताना इंग्लंडचा संघ ४५.५ षटकांत २५९ धावा करून बाद झाला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४२.१ षटकांत ५ बाद २६१ धावा करून सामना जिंकला. सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यानेदेखील दमदार कामगिरी केली. पंड्याने त्याच्या नावाला साजेशी अष्टपैलू खेळी केली. त्याने गोलंदाजी करताना २४ धावांत ४ गडी बाद केले. तर फलंदाजी करताना ७१ धावांची तुफानी खेळी खेळली.
आगामी काळात भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायचे आहेत. दरम्यान या मालिकेसाठी भारताच्या काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसह अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही या मालिकेत खेळणार नाही. विराट कोहली आशिया चषकाआगोदर क्रिकेटमधून एक महिना विश्रांती घेणार आहे. या काळात तो फॅमिलीसोबत लंडन शहरात राहणार असल्याचेही समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar : ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाची स्थगिती उठवा; रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
- IND vs ENG : ऋषभ पंतने सामनावीर म्हणुन भेटलेले ‘हे’ खास बक्षीस दिलं रवी शास्त्रींना; पाहा VIDEO!
- Maharashtra Bus Accident In MP | बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये द्या! – अमोल मिटकरी
- Ramdas kadam : सेनेला पुन्हा धक्का, रामदास कदम यांच्याकडून शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा
- CM Eknath Shinde : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; विकासकामांना स्थगिती न देण्याची मागणी
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<