मुंबई : भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यात एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने शानदार शतक झळकावले आहे. कठीण परिस्थितीत फलंदाजीसाठी आलेल्या पंतने ८९ चेंडूत पाचवे कसोटी शतक झळकावले. इंग्लंडविरुद्धचे पंतचे हे तिसरे शतक ठरले. त्याने इंग्लंडच्या भूमीवर पाच सामन्यांमध्ये दोन शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतही शतके झळकावली आहेत.
पंतने ५२ व्या डावात आपले पाचवे कसोटी शतक झळकावले. पंतने इंग्लंडविरुद्धही ४००हून अधिक धावा केल्या आहेत. आपल्या शतकी खेळीत पंतने १५ चौकार आणि १ षटकार मारले. पंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण केले आहेत आणि वयाच्या २४व्या वर्षी अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे. पंतनंतर सुरेश रैनाने वयाच्या २४व्या वर्षी भारतासाठी ९९ षटकार ठोकले होते. यासोबतच पंतने त्याच्या २००० कसोटी धावाही पूर्ण केल्या आहेत. त्याने यापैकी १३००० पेक्षा जास्त SENA देशांमध्ये ठोकल्या आहेत.
A special 💯 from @RishabhPant17 👌👏💯
This is his 5th in Test cricket and has come at a crucial moment for #TeamIndia
Live – https://t.co/LL20D1K7si #ENGvIND pic.twitter.com/Ajd0PgFrPZ
— BCCI (@BCCI) July 1, 2022
ऋषभ पंत फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताची धावसंख्या ५ बाद ९८ अशी होती, मात्र त्याने आपल्या तुफानी फलंदाजीने भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. ऋषभ पंतने इंग्लंडच्या जेम्स अँडरसन, बेन स्टोक्स आणि जॅक लीचसारख्या धोकादायक गोलंदाजांचा धुव्वा उडवला. पंतने मैदानाभोवती जोरदार शॉट्स खेळले. जगातील सर्वात धोकादायक गोलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या जेम्स अँडरसनलाही पंतने सोडले नाही.
पंत इंग्लंडच्या भूमीवर दोन कसोटी शतके झळकावणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज आहे. भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीतही असा पराक्रम करू शकला नाही. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही देशांमध्ये कसोटी शतक झळकावणारा पंत हा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<