मुंबई : भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यातील बहुप्रतिक्षित पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. बर्मिंगहॅम कसोटीच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र वगळता भारतीय संघाने आतापर्यंत प्रत्येक सत्रात यजमानांना मागे टाकले आहे. भारताच्या पहिल्या डावातील ४१६ धावांना प्रत्युत्तर देताना दुसऱ्या दिवसअखेर इंग्लिश संघ पहिल्या डावात आपल्या ५ आघाडीच्या फलंदाजांच्या विकेट्स गमावून केवळ ८४ धावांवर गडगडला.
इंग्लिश संघाला दुसऱ्या दिवशी सर्वात मोठा फटका माजी कर्णधार आणि सध्या इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा असलेल्या जो रूटच्या रूपाने बसला. खरेतर रुट मैदानात भारतीय गोलंदाजांचा सामना करत होता, मात्र २३व्या षटकात भारताकडून मोहम्मद सिराजच्या शेवटच्या चेंडूवर त्याचा संयम सुटला. सिराजच्या शॉट पिच बॉलवर त्याने कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण बॉल आणि बॅटचा संपर्क खराब झाल्यामुळे त्याने आपली मौल्यवान विकेट गमावली.
Mohammad Siraj gets Joe Root with a beauty, massive one for India and Siraj. pic.twitter.com/s4kg28KJWu
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 2, 2022
जो रूट आपल्या संघासाठी पहिल्या डावात ३१ धावा करण्यात यशस्वी ठरला. यादरम्यान त्याने ४ चौकार मारले. इंग्लिश संघाचा जो रुट बाद झाला तेव्हा संघाची एकूण धावसंख्या २३ षटकं संपल्यानंतर ४ गडी गमावून ७८ धावा होती. दुसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत सिराजने तीन षटके टाकली. दुसऱ्या दिवसअखेर सामन्यात सिराजशिवाय कर्णधार जसप्रीत बुमराहने तीन आणि शमीने भारतासाठी एक यश मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या –
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<