मुंबई : एजबॅस्टन कसोटी सामन्यासाठी (ENG vs IND) सलामीवीर मयंक अग्रवालचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मयंक अग्रवाल सोमवारी इंग्लंडला रवाना होणार असून संध्याकाळपर्यंत भारतीय संघात सामील होणार आहे. याआधी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी मयंक अग्रवालचा संघात समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, केएल राहुलची दुखापत आणि रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर संघात सलामीवीरांची कमतरता भासू शकते आणि याच कारणामुळे मयंक अग्रवालचा संघात समावेश करण्यात आला आहे.
मयंक अग्रवाल मार्चमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भाग घेतला होता. मात्र, त्याला दोन सामन्यांत १९.६६च्या सरासरीने केवळ ५९ धावा करता आल्या. यानंतर, त्याने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसाठी भाग घेतला. शिवाय रणजी ट्रॉफीचा उपांत्यपूर्व सामना उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला.
🚨Mayank Agarwal called up for the England Test in Edgbaston.
India still await an update on Rohit Sharma's availability.
Details: 👇👇 https://t.co/GDVD2taPoD
— Cricbuzz (@cricbuzz) June 27, 2022
मयंक अग्रवालची आयपीएलमध्ये कामगिरी चांगली नव्हती. त्याने फक्त १९६ धावा केल्या. यामुळेच टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मयंक अग्रवालला खराब फॉर्ममुळे कसोटी संघातील स्थान गमवावे लागू शकते, असे विधान केले होते आणि तसे झाले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<