मुंबई : भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यात मागील वर्षी रद्द झालेली कसोटी आजपासून बर्मिंगहॅममध्ये खेळवली जात आहे. या कसोटीत बेन स्टोक्स इंग्लंडचे तर जसप्रीत बुमराह भारताचे नेतृत्व करत आहे. नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला असून त्यांनी भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. उपाहारापर्यंत भारताने दोन फलंदाजांना गमावले असून ५३ धावा केल्या आहेत.
भारताचा पहिला डाव
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिल यांनी भारतासाठी सलामी दिली. पहिल्या गड्यासाठी २७ धावा केल्यानंतर शुबमन गिल (१७) माघारी परतला. त्यानंतर अर्धशतकापूर्वी चेतेश्वर पुजाराही (१३) बाद झाला. दोघांना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने जॅक क्रॉलीकरवी झेलबाद केले. उपाहारापर्यंत भारताने २०.१ षटकात २ बाद ५३ धावा केल्या असून विराट कोहली एक तर हनुमा विहारी १४ धावांवर नाबाद होते.
Early Lunch has been taken.#TeamIndia 53/2 at Lunch on Day 1 https://t.co/xOyMtKJzWm #ENGvIND
Weather permitting, second session to restart at 12.48 PM local time (5.18 PM IST) pic.twitter.com/Xmxv2QIYRq
— BCCI (@BCCI) July 1, 2022
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (कर्णधार).
इंग्लंड – अॅलेक्स लीस, जॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्ज, मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.
महत्त्वाच्या बातम्या –
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<