मुंबई : जसप्रीत बुमराहने आक्रमक फलंदाजी करत टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या (ENG vs IND) कसोटीत मजबूत स्थितीत पोहोचवले आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या दिवशी भारत पहिल्या डावात ४१६ धावांवर सर्वबाद झाला. बुमराहने १६ चेंडूत ३१ धावा केल्या. यादरम्यान स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ३५ धावा ठोकल्या गेल्या. यापैकी बुमराहने २९ धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक आहे. बुमराहने ४ चौकार आणि २ षटकार मारले. यानंतर गोलंदाजी करताना बुमराहने अॅलेक्स लीस आणि जॅक क्रॉली, ओली पोप यांना बाद करत संघाला मोठे यश मिळवून दिले.
जसप्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार ठोकताच विश्वविक्रम झाला. ड्रेसिंग रुममध्ये प्रशिक्षक राहुल द्रविडने टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. बुमराहच्या फलंदाजीवर तो खूप खूश होता आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्याशी बोलतानाही दिसला. त्याचवेळी विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी हसत टाळ्यांचा कडकडाट केला. त्याचवेळी बुमराहसोबत फलंदाजी करणाऱ्या सिराजने त्याला मिठी मारली. कसोटीच्या इतिहासात यापूर्वी कधीही एका षटकात ३० धावा झाल्या नव्हत्या.
— Guess Karo (@KuchNahiUkhada) July 2, 2022
On a lighter note. The last time Rahul Dravid screamed like this from the dressing room, I was batting in the middle 😀 #CricketTwitter #INDvENG pic.twitter.com/xUOxe9uzTe
— ದೊಡ್ಡ ಗಣೇಶ್ | Dodda Ganesh (@doddaganesha) July 1, 2022
🔥 4 5wd 6nb 4 4 4 6 1 🔥
Jasprit Bumrah v Stuart Broad – What an over! 🏏#WTC23 | #ENGvIND pic.twitter.com/WnGyEBmF0N
— ICC (@ICC) July 2, 2022
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने पहिल्या डावात केवळ ८४ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या. भारतीय संघाकडे अजूनही ३३२ धावांची आघाडी आहे. जॉनी बेअरस्टो १२ धावांवर खेळत आहे. जो रूटला मोठी खेळी खेळता आली नाही. टीम इंडियाने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या आहेत. ऋषभ पंतनंतर रवींद्र जडेजानेही शतक झळकावले. मात्र, पावसामुळे तीन वेळा खेळ थांबवावा लागला. बुमराहने आतापर्यंत ३ बळी घेतले आहेत. त्याचवेळी शमी आणि सिराजला प्रत्येकी एक विकेट मिळाली. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-१ने आघाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<