मुंबई : एजबॅस्टन येथे इंग्लंड आणि टीम इंडिया (ENG vs IND) यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या कसोटीच्या तिसर्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी प्रत्येक विभागात आपली चमक दाखवली. या कसोटीत आतापर्यंत खऱ्या अर्थाने एक अष्टपैलू म्हणून दिसणारा खेळाडू म्हणजे जसप्रीत बुमराह, जो पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व करत आहे. धमाकेदार खेळी आणि दमदार गोलंदाजीनंतर आता बुमराहने क्षेत्ररक्षणातही कमाल केली आहे.
जसप्रीत बुमराहसाठी ही कसोटी संस्मरणीय ठरत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय डावाच्या शेवटी त्याने नाबाद ३१ धावा करून सर्वांना थक्क केले, यादरम्यान स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात विक्रमी ३५ धावाही पाहायला मिळाल्या. यानंतर गोलंदाजीचा विचार केला तर बुमराहने पहिले तीन विकेट घेत इंग्लंडच्या टॉप ऑर्डरला खिंडार पाडण्याचे काम केले.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत बुमराहने एकही विकेट घेतली नाही, पण बुमराहच्या एका शानदार झेलने जॉनी बेअरस्टो आणि इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स यांच्यातील उत्कृष्ट भागीदारी तोडण्याचे कामही केले. जेव्हा बेन स्टोक्स २५ धावा करून डावाला भक्कमपणे पुढे नेण्याचा विचार करत होता, तेव्हा शार्दुल ठाकूरच्या षटकात त्याने मिड-ऑफच्या दिशेने जबरदस्त शॉट खेळला. पण त्यानंतर तिथेच उभ्या असलेल्या बुमराहने शानदार सूर मारत झेल घेतला, जो पाहून स्टोक्सही आश्चर्यचकित झाला.
A pretty special catch. It's been an enthralling morning.
Scorecard/Videos: https://t.co/jKoipF4U01
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/wBr6gvOD6x
— England Cricket (@englandcricket) July 3, 2022
इंग्लंडचा पहिला डाव ६१.३ षटकात २८४ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने शतक ठोकले. त्याने १४० चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांसह १०६ धावा केल्या. मोहम्मद शमीने त्याला बाद केले. भारताकडून या डावात मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ बळी घेतले. बुमराहने ३ आणि शमीने २ फलंदाजांना बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<