बिग ब्रेकींग: अर्जुन खोतकरांच्या जालन्यातील घरावर ईडीचा छापा

बिग ब्रेकींग: अर्जुन खोतकरांच्या जालन्यातील घरावर ईडीचा छापा

Kirit Somiayya and Arjurn Khotkar

जालना : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जालना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी ही छापेमारी करण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या यांच्या जालन्यामधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ED) शुक्रवारी सकाळी छापा टाकला आहे.

जालन्यामध्ये अर्जुन खोतकर यांच्या घरी आज सकाळी साडे 8 वाजता ईडीने छापा टाकला आहे. अर्जुन खोतकर हे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यामुळेच जालन्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतही ईडीकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. सकाळी साडे 8 वाजल्यापासून ईडीचे पथक अर्जुन खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यामध्ये आहेत.

12 जणांचं पथक या ठिकाणी तपासणी करत आहे. आतमधून दरवाजे बंद केले असून कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. छापा पडला तेव्हा अर्जुन खोतकर हे घरीच असल्याची अशी माहिती समोर आली आहे.

औरंगाबादमधील उद्योजकांच्या माध्यमातून रामनगर सहकारी साखर कारखान्यामध्ये अर्थिक संबंध असल्याची तक्रार सोमय्यांनी केलेली. यापूर्वी खोतकरांनी हे आरोप फेटाळून लावले होते. आपले काही लाखांचे शेअर्स कारखान्यात आहेत. आपण भागीदार आहोत. मालक नाही, असं अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या: