‘ऊर्जामंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्क म्हणून काम करावं’

nitin raut

उस्मानाबाद – वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर सुरु असलेले आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. भाजपा नेत्यांनी वीज बिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं मी ती बिलं तपासून पाहिन असं काल उर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. आता राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी समाचार घेतला आहे.

प्रवीण दरेकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. ‘ऊर्जामंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्क म्हणून काम करावं, भाजप कार्यकर्ते त्यांना वीज बिलं दाखवतील’, असा खोचक टोला दरेकर यांनी नितीन राऊतांना लगावला आहे.

दरम्यान, भाजपा नेत्यांनी वीज बिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं, मी सर्व बिलं तपासून पाहिन जर वाढीव वीज बिलं नसतील तर भाजपा नेत्यांनी प्रॉमिस करावं की आम्ही सर्व वीज बिलं भरू असं काल झालेल्या पत्रकार परिषदेत नितीन राऊत म्हणाले होते. त्यांना आज खोचक टोला लगावत प्रविण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या