जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : किदांबी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

srikanth
Ending Kidambi Srikanth's challenge

नवी दिल्ली : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात आले आहे. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या कोरियाच्या सोन वान हो याने श्रीकांतचा २१-१४, २१-१८ असा पराभव केला.

श्रीकांतच्या पराभवसह स्पर्धेच्या पुरूष एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. दरम्यान, महिला एकेरीत सिंधू आणि सायनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.