fbpx

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशासाठीचा ७०/३० फार्मूला रद्द करा – संभाजी सेना

टीम महाराष्ट्र देशा : मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर वैद्यकीय प्रवेशासाठी बळजबरीने थोपविण्यात आलेला ७० / ३० चा फार्मूला रद्द करावे, या मागणीसाठी परभणी संभाजी सेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

वैद्यकीय प्रवेशासाठी प्रादेशिक आरक्षण देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर वैदकिय प्रवेशासाठी ७० / ३० चा फार्मूला वापरण्यात येत आहे. दरम्यान परभणी संभाजी सेनेने याचा विरोध करत मोर्चा काढला आहे.

संभाजी सेनेच्या वतीने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर वैद्यकीय प्रवेशासाठी बळजबरीने थोपविण्यात आलेला ७० / ३० चा फार्मूला विरोधात बोंबाबोंब  मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे या मोर्चात पालक व विद्यार्थी आक्रमक भूमिकेत उपस्थित होत्ते.

विशेष म्हणजे वैद्यकीय प्रवेशासाठी असलेलं प्रादेशिक आरक्षण रद्द करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी इतर आमदारांसह विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसत घोषणाबाजी केली होती.