रस्त्यावरील अतिक्रमणामुळे पडून होता निधी

परतूर: परतूर शहरातील मुख्य रस्त्याच्या कामासाठी गेली बरेच दिवस निधी पडून होता त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणास उशीर होत होता परंतु नगरपरिषदेने आज बोलीस बंदोबस्तात मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्त्याच्या कामाची सुरुवात होणार असे संकेत दिले आहेत.

या रस्त्याची रुंदी 50 फूट इतकी होणार असून यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, यावेळी नागरपरिषदेचे मुख्य अधिकारी गंगाधर इरलोड व कर्मचारी यांची उपस्थिती होते तर पोलीस निरीक्षक रेंगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता