इम्रान खान यांना नोबल पारितोषिक दया, पाकिस्तान नागरिकांची मागणी

टीम महाराष्ट्र देशा : पाकिस्तान आज अभिनंदन वर्धमानला भारताच्या स्वाधीन करणार आहे अशी घोषणा पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांनी काल पाकिस्तानच्या संसदेत केली. अभिनंदनला भारतच्या स्वाधीन करून आम्ही दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करत आहे. असा खोटा आव इम्रान यांच्याकडून आण्यात आला. तर आता पाकिस्तानमध्ये इम्रान खानच्या या वक्तव्या मुळे इम्रान खान यांना नोबल पारितोषिक देवून सन्मानित करण्यात याव अशी मागणी केली जात आहे.

सोशल मिडीयावर देखील ‘#NobelPeacePrizeForImranKhan’ हा ट्रेंड पाहायला मिळत आहे.

Loading...

भारताने बालाकोट येथे केलेल्या एअर स्टाईकला प्रत्युत्तर देण्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. सतर्क असणाऱ्या भारतीय वायुदलाने पाकच्या विमानांना पिटाळून लावले होते. यावेळी मिग-२१ चे विंग कमांडर पाकच्या हद्दीत शिरले होते. तेथे त्यांचे विमान पाडण्यात आले. पण त्यांनी लगेच पॅराशूटद्वारे खाली उडी मारली होती. यावेळी स्थानिक पाकच्या लष्कराने त्यांना ताब्यात घेत होत.

काल पाकिस्तान संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी पुढाकार म्हणून भारतीय वैमानिकाची सुटका करणार असल्याची घोषणा केली होती. तसेचं आमच्या या पावलाला कोणी पाकिस्तानचा कमकुवतपणा समजू नये. असा इशारा देखील इम्रान खानने दिला होता.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...