वीजेवर चालणाऱ्या वाहनांमुळे रोजगार संधी वाढणार – इरिक सोल्हेम

blank

संयुक्त राष्ट्र संघ- पर्यावरणचे कार्यकारी संचालक इरिक सोल्हेम म्हणाले,प्रदूषणापासून देश व पर्यावरणाच्या रक्षणासाठी याप्रकारची पावले उचलणे आवश्यक ठरणार आहे. यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने पुढाकार घेतला आहे. वीजेवर चालणारी वाहने ही पुढील काळाची आवश्यकता ठरणार असून ती स्वस्त व पर्यावरणपूरक आहेत. यामुळे या क्षेत्रात रोजगार संधी व आर्थिक भरभराट होणार आहे.

यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी पर्यावरण रक्षणासाठी महिंद्रा कंपनी नेहमीच सहकार्य करणार असल्याचे सांगितले. टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक प्रविर सिन्हा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे आदी यावेळी उपस्थित होते.