आता सरकारी, निम सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मिळणार कोरोना लस

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रौद्ररुप धारण केले आहे. देशात दररोज १ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. देशभरात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील काही दिवसांपासून देशभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. वाढत्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही हे आता सप्ष्ट झाले आहे.

केंद्र सरकारने सरकारी आणि निम सरकारी कार्यालयातील ४५ वर्षाखालील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने राज्य सरकारला या संदर्भात पत्र पाठवले आहे. कार्यालयात कोरोनाचे लसीकरण करण्यात यावे. एका वेळी १०० जणांना लस देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने कार्यालयातील ४५ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांना लस देण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशव्यापी कोरोना लसीकरणाची मोहिम राबवण्यात येत आहे. ज्याअंतर्गत एकूण तीन टप्प्यांमध्ये कोरोना लसीचा डोस देण्यात येत आहे. आता मोहिम अधिक व्यापक करण्यासाठी कामाच्या ठिकाणी लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, देशभरात कोरोना बाधितांचा आकडा १ कोटी २७ लाख ९९ हजारांवर पोहोचला आहे. आतापर्यंत १ लाख ६६ हजार २०८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात जवळपास १ कोटी १७ लाख ८९ हजार ७५९ लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच वर्तमान काळात कोरोना अॅक्टिव रुग्णांचा आकडा ८ लाख ४३ हजारांच्या पार पोहोचला आहे.

महत्वाच्या बातम्या